नुकसानग्रस्त पुलांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आमदार शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना
लोहा (प्रतिनिधी )
लोहा तालुक्यातील सावरगाव, रिसंनगाव , कोष्ट वाडी, हुलेवाडी, लव्हराळ, राम तीर्थ ,आष्टुर सह परिसरात अतिवृष्टी होऊन पावसाच्या पाण्याने कहर केला होता ,या ढगफुटीमुळे परिसरातील नदी ,नाले तुडुंब वाहत असताना शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता, पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन मंगळवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला,
यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, यावेळी उपजिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर ,तहसीलदार राम बोरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैजनाथ दाडगे ,तालुका कृषी अधिकारी घुमनवाड, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे , खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार ,सरपंच राजू भावे ,जगदीश कदम, सतीश कदम, संचालक सुधाकर सातपुते, उपस्थित होते.
यावेळी सावरगाव, रिसनगाव, कोष्ट वाडी, हुलेवाडी, येथील अतिवृष्टीच्या पाण्यामुळे पुलांचा भराव वाहून गेल्याने या पुलावरून जाणारे रस्ते अक्षरशा जलमय होऊन रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती, या पुलांची पाहणी आमदार शामसुंदर शिंदे यांनी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैजनाथ दाडगे यांना तात्काळ या पुलांची दुरुस्ती करण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी दिल्या.
सोमवारी बारा तासात 196 मि.ली पाऊस झाला असून या ढगफुटीमुळे परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शेतीची मोठ्याप्रमाणात खरडपट्टी झाली असल्याने या भागातील नुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी प्रशासनास दिल्या ,यावेळी संतोष मुकणर, तलाठी पूजा गाडे, सिद्धू पाटील वडजे ,सचिन शिरसागर, गोविंद हबगुंडे सह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते.