मुखेड:
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ॲड.संदीप कामशेट्टे तर सचिवपदी महेताब शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठीची जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेत ज्येष्ठ पत्रकार दादाराव आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ॲड. संदीप कामशेट्टे तर सचिवपदी महेताब शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – ॲड. संदीप कामशेट्टे, सचिव – महेताब शेख, कार्याध्यक्ष – नामदेव श्रीमंगले, उपाध्यक्ष – शेखर पाटील, भास्कर पवार, संघटक – जगदीश जोगदंड, प्रसिद्धीप्रमुख – जैनुद्दीन पटेल, सहसचिव – दत्तात्रय कांबळे, कोषाध्यक्ष – रामदास पाटील, कायदेशीर सल्लागार – ॲड. आशिष कुलकर्णी, सल्लागार – दादाराव आगलावे, सुशील पत्की, शिवकांत मठपती, संजय कांबळे, राजेश बंडे, ज्ञानेश्वर डोईजड. कार्यकारणी सदस्य विजय बनसोडे,प्रेसफोटोग्राफर हाफिजखान पठाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.