पंचायत राज समिती प्रमुखास माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांची शेतकऱ्यांसाठी मागणी

कंधार  ; प्रतिनिधी

रोजगार हमीच्या फंडातून गरीब शेतकऱ्यांची शेतीची कामे  करून देण्याची माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी पंचायत राज समिती प्रमुख आमदार महादेवराव जानकर यांना केली आहे.

या निवेदनात असे नमुद केले की सदरी प्रकरणी मी आमदार असतांना १९७६-७७ साली रोजगार हमी समितीवर सदस्य म्हणून होत त्यावेळी आमच्या समितीने १६ जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यानंतर विधानसभेला दिलेल्या अहवालावर  सूचना केली होती. आपण शेतकरी संघटनेचे नेते असल्याने मुद्दाम पुन्हा ही सूचना करावी.

दरवर्षी रोजगार हमीची रक्कम अखर्चीत राहते व ती इतर कामासाठी वापरल्या जाते. ही इतर प्रत्येक गावांत अल्पभूधारक शेतकरी आहेत.

त्यांना शेतीची मशागत वगैरे साठी कर्ज काढावे लागते. शेवटी तेव्हा त्या शेतकन्यांची पेरणी पासून ते मळणी पर्यंतची कामे रो. ह. खात्यातून मजूरांकडून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पण मजूर गृहीत धरून मजुरी देण्यात यावी. त्यामुळे शेतकयांचा या कामावर होणारा खर्च ही वाचेल तेवढीच त्याला मदत ही होईल. तसेच मजुरांनाही कामे मिळतील. तो पैसा इतर कामासाठी बंद होईल.


या सुचनेचा विचार करून आपल्या या समिती शासनाला शिफारस केल्यास शेतकन्यांचा फार मोठा प्रश्न सुटणार आहे. सदर सूचनेची आवश्यक दखल घ्यावी असे माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *