लोहा ; प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील हातणी येथे लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल रविवारी भेट दिली व हातणी येथील विविध समस्यांचा आढावा घेतला, यावेळी हातनी गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे गावातील मुख्य रस्त्याला आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी स्थानिक विकास निधीतून चार लक्ष रुपये निधीचे पत्र दिले .
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे, चेअरमन गणेश राव हंबर्डे ,सरपंच वसंतराव कदम ,माजी सरपंच सुनील भदर्गे ,सभापती प्रतिनिधी संदीप पाटील उमरेकर, भास्करराव पाटील जोमेगावकर, सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, राजू पाटील वडवळे, माधवराव कदम, माजी सरपंच मूर ताजी पाटील ,सरपंच शामगिरी महाराज ,युवा नेते रोहित पाटील शिंदे, सरपंच पंजाबराव माळेगावे, सुरेश येळीकर ,श्याम सावळे, सचिन कुदळकर सह कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की हातणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून, हातणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आमदार शिंदे यांनी गावकऱ्यांचशी बोलताना स्पष्ट केले.