वसंतनगर ता.मुखेडच्या विविध शाखांच्या वतीने राठोड पिता पुत्राला श्रद्धांजली


मुखेड -संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड यांचे सुपुत्र भगवान किशनराव राठोड व त्यांचे नातू कै. संदीप भगवानराव राठोड यांचे काल अपघाती दुःखद निधन झाले.त्यांना वसंतनगर ता. मुखेड येथील विविध शाखांच्या वतीने दि.०८सप्टेंबर २०२१ रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या श्रद्धांजली साठी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगरचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य दिलीप गायकवाड,उपमुख्याध्यापिका सौ. प्रेमला स्वामी,पर्यवेक्षक सुभाष राठोड,स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.व्यंकट चव्हाण,माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने व वसंतनगर संकुलातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *