कंधार
कंधार तालुक्यात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कुठलेही पंचनामे न करता सारसगट नुकसानभरपाई देण्यात यावे या साठीचे निवेदन तहसीलदार कंधार यांना भाजपच्या वतीने देण्यात आले.
कंधार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी ,ढगफुटी झाली आहे त्या मुळे शेतकऱ्यांचे खरीपाचे पिके संपूर्ण नष्ट झाली आहेत तर अनेक गावांमध्ये नदी नाले यांनी आपला प्रवाह बदलल्याने शेत जमीन खचून वाहून गेली आहे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्या मुळे पंचनाम्याचे कागदी घोडे न नाचवत तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्या साठी त्यांना सारसगट विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाउपाध्यक्ष माधव जकापूरकर,कैलास मोहन गिरी,रमेश पवार,सुधाकर राठोड,यांनी तहसीलदार कंधार यांच्या कडे निवेदनाद्वारे दि ९ सप्टेंबर रोजी केली.