सरसगट शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या – बालाजी देवकांबळे

पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यात फुलवळ येथे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांनी दिले निवेदन…!

कंधार ; प्रतिनिधी

पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यात फुलवळ येथे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांनी निवेदन दिले.तर सरसगट शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी मागणी केली.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांचा ता. ९ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी भागातील पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नियोजित दौऱ्यात नांदेड वरून पांगरा मार्गे मुखेड ला दौरा जात असताना फुलवळ येथील ग्रामस्थांनी त्यांनी धावती भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री महोदयांच्या सोबत आमदार श्यामसुंदर शिंदे , माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे , डॉ. श्याम तेलंग , संजय भोसीकर , संतोष पांडागळे यांच्यासह त्या त्या विभागाचे विभाग प्रमुख , अधिकारी , कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा होता.

आज आपले पालकमंत्री येणार या जोशपूर्ण वातावरणात ग्रामस्थ व अतिवृष्टीने हवालदिल झालेले शेतकरी , काँग्रेस कार्यकर्ते  सकाळपासूनच फुलवळ येथील बसस्थानक येथे मोठ्या संख्येने हजर होते . ता. ५ , ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेती व शेतीपिकांचे झालेले अतोनात नुकसानग्रस्त शेती व पिकांची पाहणी करून संबंधित प्रशासनाला काय आदेश देतील आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना कसला दिलासा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

पालकमंत्री फुलवळ ला येताच येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थित नागरिकांनी अनेक विषयांवर पालकमंत्री महोदयांचे लक्ष वेधत आपल्या व्यथा मांडल्या. त्याच बरोबर अन्य मागण्यांची निवेदन ही त्यांना देण्यात आली. त्यातील प्रमुख मागण्या अशा , अतिवृष्टी भागातील पंचनामे न करता सरसकट मोबदला देण्यात यावा , संकटग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे , फुलवळ येथे विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चे काम अर्धवट झाले असून उर्वरित काम करण्यास संबंधित एजन्सी टाळाटाळ करत असल्याचे पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत अर्धवट राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी त्या एजन्सी ला आदेशीत करावे आदी मागण्यांचे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांनी निवेदन दिले.

यावेळी सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , ग्रा.प.सदस्य प्रवीण मंगनाळे , ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे , मंडळ अधिकारी एस एम पटणे , तलाठी श्रीदेवी उस्तुर्गे , पो.पा. इरबा देवकांबळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *