कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्रात गौरी पूजन हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी (लक्ष्मी) चे आगमन होते.काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात.
मुलीला मान -सन्मान मिळायला पाहिले तसा सन्मान आपल्या समाजामध्ये मुलीला भेटत नाही .सुनेला जसा आदर्श भेटायला पाहिजे तसा भेटत नाही त्यानिमित्त रामचंद्र येईलवाड यांनी एक वेगळा व अनोखा कार्यक्रम लक्ष्मीपूजन च्या दिवशी घेतला.महालक्ष्मी दिनानिमित्त चोळी चा दनदनित कार्यक्रम सुद्धा करण्यात आला.
आपल्या सुनेला लक्ष्मी मानावे हजारो वर्षांपासून आपण घरी लक्ष्मी बसवतो आपण लाकडी लक्ष्मी व चिखलाचा मुखवटा बसवतो व त्याला रंगीबेरंगी कपडे नेसवतो.हजारो रुपये खर्च करतो खरेच ही लक्ष्मी आहे का ?असा सवाल येईलवाड यांनी केला.
त्यांनी आपल्या घरच्या सुनां वर्षा सुदर्शन येईलवाड ,प्रतिभा शशिकांत येईलवाड यांची पूजा केली. सुना या आपल्या घरच्या लक्ष्मी असते.ही लक्ष्मी आपला वंश वाढवतो .त्याच्या भविष्यातील पुढील पिढी घडते.आणि आपल्या लेकीमुळे,बहिणीमुळे,ज्या घरी आपण कन्यादान करतो ती त्याघरची लक्ष्मी आहे .कुटुंब पध्दती नष्ट होत आहे.
ज्या महिलांचा लक्ष्मी पूजन मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मीची पाऊले पडायला सुरुवात होते । “बेटी बचाओ बेटी पढाओ” फक्त नावाप्रमाणेच आहे आज महिलांवर अत्याचार होत आहेत हे सर्व परिवर्तन केले पाहिजे.
चालती बोलती लक्ष्मी हीच खरी लक्ष्मी आहे. तुमची लक्ष्मी तुमची सून,माय, बहीण आहे असा संदेश त्यांनी दिला.
समाजातील सर्व कुटुंबाने जर महिलांना सन्मान देऊ केला.त्यांना शिकण्याची संधी दिली ,मुलींना सक्षम बनवले ,मुलींना सामर्थ्य दिले तर कुठल्याच देवतेची पूजा करायची वेळ लागत नाही.
कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर मुकुंदराव बेलकर प्रदेशाध्यक्ष सरपंच संघटना काँग्रेस पार्टी महाराष्ट्र अरुण करेवाड, माऊली वारकड, गोटमवाड सर ,गव्हाणे सर, अंतेश्वर फुगणार सर, नलाबले सर, शिंदे सर ,मोरे ,शेख रहिमत, माधव नलाबले , राघोजी गोरे प्रफुल हरणवाडी चे माजी सरपंच दत्ता येडले ,चेअरमन प्रभू एडले, सुभाष घुमे, अश्विनी नलावले, शिंदे मॅडम, गव्हाणे मॅडम ,माजी सरपंच गवळण बाई कुकुडवाड, शेख तनवीर विशाल गायकवाड , कंधार येथील पत्रकार बांधव ,व मोठ्या प्रमाणावर महिला मंडळी व गावकरी मंडळी मित्रमंडळी यांची उपस्थिती होती.