बहुजन भारत पार्टी नांदेड जिल्हा सचिव पदी पांडुरंग झुंजारे तर सहसचिव पदी गणपत वाघमारे यांची निवड

नांदेड ; प्रतिनिधी

झुंजारे पांडुरंग यांची बहुजन भारत पार्टी नांदेड जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली .तर वाघमारे गणपत दगडु यांची बहुजन भारत पार्टी जिल्हा नांदेड महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच यावेळी मार्गदर्शन करण्यात आले व नेमकी पक्षाची भुमीका यावेळी सांगण्यात आली.

बहुजन भारत पार्टी ही पार्टी मांतग समाजाच्या व तस्म समाजात लहु फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ कांशीरामजी यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करून सामाजिक व राजकीय प्रबोधन करून मांतग समाज व बहुजन समाज यांना शासन कर्ते वर्ग बणण्यासाठी तसेच समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी बहुजन समाजातील अनेक जातीला बहुजन भारत पार्टी च्या माध्यमातून जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे .

या सामाजिक भावना निर्माण करून बहुजन समाजाला राजकीय माध्यमातूनएकत्र जोडण्याच्या कार्या आपले योगदान असणे गरजेचे आहे तेव्हा आपण या बहुजन भारत पार्टीत सामील व्हावे राजकीय अस्तित्व निर्माण करावे असे मार्गदर्शन यावेळी मराठवाडा औरंगाबाद विभाग अध्यक्ष बालाजी गजले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *