कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांची हिंगोली येथे बदली झाल्यानंतर कंधार येथील उपविभागीय अधिकारी ही जागा रिक्त होती त्या जागेवर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील शंकर मंडलिक यांनी कंधार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने शंकर मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष ,प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड ,तिरुपती पाटील भागानगरे जिल्हा सल्लागार नांदेड व हनुमंतराव पाटील कौडगावकर ,बाळा पाटील पांडोरणे , अविनाश पाटील कल्याण तालुका उपाध्यक्ष कंधार यांची यावेळी सत्कार प्रसंगी उपस्थिती होती.