कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कुरूळा परिसरात मोठा पाऊस पडल्यामुळे शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी मौ हणमंतवाडी येथील बबन दत्ता लिमकर वय 21 वर्षे सकाळी गावालगतच्या नदीतून वाहून गेल्याची घटना घडली आहे.
सदरील माहिती हणमंतवाडी येथील पोलीस पाटील यांनी तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागास कळविले त्यावरुन शोधकार्य सुरू पण नदीला पाणी जास्त असल्याने शोधमोहीमेला अडचण येत असून आद्याप यश आले नाही.
दरम्यान मौ. हणमंतवाडी येथे मा. उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक व तहसीलदार कामटेकर यांनी स्वतः भेट देऊन शोधकार्याबाबत आढावा घेतला. त्यावेळी मंडळधिकारी गजलवाड , तलाठी कल्याणकर तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब गोमारे व सरपंच व गावकरी मंडळी उपस्थित होते.