फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून IAS दिल्ली इन्स्टिट्यूट चे १८ पैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पहिल्या १०० च्या यादी मध्ये ३ विद्यार्थी या इन्स्टिट्यूट चे असल्याचे या इन्स्टिट्यूट चे मार्गदर्शक गजानन वडजे यांनी सांगितले . पुढे बोलताना ते म्हणाले की IAS बनण्याचे माझे स्वतःचे स्वप्न भंगले परंतु या इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अनेकांचे ते स्वप्न रंगवले यातच मोठे समाधान असल्याचीही प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
गजानन शंकरराव वडजे तसे मूळचे लोहा तालुक्यातील शेलगाव ( धानोरा ) येथील रहिवासी असून त्यांचं प्राथमिक शिक्षण कंधार येथील मनोविकास प्रा.शाळेत तर माध्यमिक शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयातून पूर्ण करतांना ते इयत्ता दहावीत बोर्डातून १३ वा क्रमांक पटकावत मेरिट मध्ये उत्तीर्ण झाले .
राजर्षी शाहू कॉलेज येथून ११ वी , १२ वी पूर्ण केल्यानंतर एसजीजीएस इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथे प्रवेश घेतला , पदवी पूर्ण होताच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस मध्ये कंपनीतर्फे यूएसए येथे एक वर्षाचा अनुभव घेतला पण तेथेही त्यांच मन रमेना आणि प्रशासकीय सेवेत येऊन समाजासाठी काही तरी करावं ही जिद्द त्यांना गप्प बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी तिथला राजीनामा देऊन थेट दिल्ली गाठली आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. २०१४ ते २०१७ च्या कालावधीत त्यांना यश सतत हुलकावणी देत राहिले आणि त्यांचे IAS होण्याचे स्वप्न भंगले पण त्यानंतर ही त्यांनी धैर्य न खचू देत या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याच्या हेतूने २०१८ साली आपल्या सहकार्याच्या सोबतीने IAS दिल्ली इन्स्टिट्यूट चालू केले.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यादीत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा टक्का प्रामुख्याने दिसून येतो. विशेष बाब म्हणजे IAS दिल्ली इन्स्टिट्यूट या संस्थेने प्रशिक्षण दिलेले १८ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते , त्यातून तब्बल १२ विद्यार्थी हे IAS दिल्ली इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण घेलेलेले अंतिम यादीत उत्तीर्ण झाले. त्यातही पहिल्या १०० मध्ये ३ विद्यार्थी चमकले त्यात P Srija यांनी २० वा रँक , अक्षीता गुप्ता ६९ वा रँक तर प्रसन्न कुमार यांनी १०० वा रँक मिळवत यश संपादन केले ही अभिमानाची बाब आहे . तर महाराष्ट्रातील प्रतीक जुईकर १७७ वा रँक , अमोल मुरकूट ४०२ वा रँक तर शुभम स्वामी ५२३ वा रँक ने हे यशस्वी झालेले विद्यार्थी पण याच संस्थेचे विद्यार्थी आहेत.
IAS दिल्ली इन्स्टिट्यूट ही गजानन वडजे , आदेश मुळे व डॉ. अजिनाथ दहिफळे , डॉ. संदीप फुंडे आदी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते.
यावर्षी याच IAS दिल्ली इन्स्टिट्यूट ने नांदेडच्या नामांकित श्री गुरू गोविंद सिंघजी इंजिनिअरिंग संस्थेसोबत करार केला असून इयत्ता १२ वी नंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चे या इन्स्टिट्यूट तर्फे मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर नांदेड सोबतच लातूर , पंढरपूर येथेही या इन्स्टिट्यूट च्या शाखा सुरुवात करण्यात आल्या असल्याचे सांगितले असून महाराष्ट्र सह मराठवाड्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी ९५५५०९८९६७ / ९४२१०९६२१० या मोबाईल क्रमांक वर व www.iasdelhi.org या वेबसाईटवर संपर्क साधावा असे आवाहन ही संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.