नदीला आलेल्या पुरात हनमंतवाडी ता.कंधार येथील तरुण गेला वाहून ; कुरुळा मंडळात पुन्हा आतिवृष्टी

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

कुरुळा मंडळात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.क्षमतेपेक्षा जास्त पाण्यामुळे नदी नाले व ओहोळ यांनी विक्राळ रूप धारण केले आहे.ठिकठिकाणी खोलगट भागात व रस्त्यावरील ओहोळाच्या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून हनमंतवाडी येथील तरुण शेतकरी नदीला पूर आल्याने पाण्यात वाहून गेला आहे.

कुरुळा मंडळात ता.२४ च्या रात्री व ता.२५ च्या पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे कुरुळा येथून जवळच असलेल्या हनमंतवाडी येथील पाणवंत नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली.सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान बबन दत्ता लिंबकर हा २३ वर्षीय तरुण हनमंतवाडी गावातून नदीच्या पलीकडे आपल्या२० ते २२ गुराढोरासह निघाला.बैल,गायी व इतर गुरे नदीपात्रातून पुढे जात असताना बबन लिंबकर या तरुणाने बैलाची शेपटी धरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.

परंतु पुढे सरकत असतानाच पाण्याचा प्रवाहच एवढा होता की, शेपटी हातातून निसटली आणि बबन प्रवाहाबरोबर वाहू लागला. साधारणतः १०० मी पर्यंत बबन दिसला त्यानंतर मात्र बबन पाण्यात बुडाला आणि मग दिसलाच नाही असे हनमंवाडी येथील पोलीस पाटील हणमंत पवार यांनी सांगितले.

गावकऱ्यांना ही बातमी समजताच शोधकार्य चालू केले परंतु आद्यापपर्यंत बबनचा थांगपत्ता लागला नाही.सदरील घटना कंधार तहसील कार्यालयास काळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *