अहमदपूर ; (प्रा.भगवान अमलापुरे )
भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक महत्त्वाची घटना म्हणजे पुणे करार होय. हा करार २४ सप्टें १९३२ रोजी झाला. या पाश्र्वभूमीवर आज रविवारी दि २६ सप्टें २१ रोजी अहमदपूर येथे विचार गोष्टींचे आयोजन करण्यात आले आहे.
या विषयी माहिती असी की देशातील अनेक राज्यात ‘ समाज ऋण ‘ परतफेड, pay back to society ( P B S P ) या कार्यक्रमाअंतर्गत दि २४ , २५ आणि २६ सप्टें २१ रोजी पुणे कराराबाबत चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्वान वक्ते या कराराबाबत विचार मांडणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, सबंध लातूर जिल्ह्यात,फक्त अहमदपूरात, आज रविवार दि २६ सप्टें २१ रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत विचार गोष्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील चर्चासत्र येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभाग्रहात पार पडणार आहे.
या चर्चासत्रात चर्चिले जाणारे विषय आणि वक्ते असे आहेत. ' पुणे करारापुर्वीचा संघर्ष ' या विषयावर औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयातील प्रा धिमंत रूपचंद राठोड,
‘ पुणे करारामुळे लाभ आणि हानी ‘ या विषयावर बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धिमंत राजेंद्र कांबळे आणि ‘ पुणे करारा नंतरची स्थिती / आव्हाने ‘ या विषयावर श्री मच्छिंद्र गोजमे सर, अध्यक्ष ग्रामीण विकास लोक संस्था, आपले विचार मांडणार आहेत.
आपण समाजातील एक जागरूक नागरिक आहात आणि ही परिचर्चा आपल्या समाजाच्या ऐतिहासिक दस्तऐवजावर आयोजित केली आहे. तेव्हा या चर्चासत्रासाठी आपण आपल्या मित्रांसोबत सहर्ष आमंत्रित आहात.
या चर्चासत्रा विषयीच्या अधिक माहितीसाठी एन डी राठोड, पे बँक टु सोसायटी प्रोग्राम, छत्रपती शाहूराजे योगा ग्रुप, अहमदपूर ,भ्र ९९२१२४८६२८ वर संपर्क साधावा.