गोजेगाव येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई ३ हजार १२० रुपयेचा मुद्देमाल जप्त तर आरोपींवर गुन्हा दाखल

मुखेड ; प्रतिनिधी


          दिनांक २८ सप्टेंबर रोजी ९ वाजुन २० मिनेटाच्या  दर्म्यान मुखेड तालुक्यातील मौजे   गोजेगाव देगलुर ते मुक्रामाबाद  लगत धाबा येथे अवैध देशी दारू विक्रीवर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली आहे.

अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर धाड सत्र सुरू असून मुक्रामाबाद पोलिसांनी छापा मारून ३ हजार १२० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात आरोपीवर गुन्हा ही दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी माहीती वरुन . तालुक्यातील मौजे गोजेगाव देगलुर ते मुक्रामाबाद येथे अवैध देशी दारू विक्री वर कार्यावाही करण्यात आली आहे. यापूर्वी ही अनेक ठिकाणी धाड टाकून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

या कार्यवाहीत फिर्यादी पोलीस काँस्टेबल दिलीप पंढरीनाथ तग्याळकर, यांच्या फिर्यादी वरुन मुक्रामाबाद पोलिस ठाणे येथे गुरन २०६/२०२१ कलम ६५ ई महाराष्ट्रा अवैध दारूबंदी कायदा प्रमाणे. गुन्हा दाखल असुन पुढील तपास पोलीस नायक यालावार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *