कंधार ; प्रतिनिधी
स्व.माधवराव पाटील पेठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बहादरपूरा येथे उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर व लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड यांच्या वतीने आयोजित नेत्र रोग तपासणी शिबिरातील रुग्णना मोफत चष्मे वाटप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णाभाऊ भोसीकर,माधवराव सुगावकर, सरपंच सौ. गोदावरीबाई गायकवाड,बालाजी तोटावाड, भीमराव कदम, माकान चन्नावार,राहुल पेटकर, ग्राम विकास अधिकारी परशुराम वाडीकर, विजय गायकवाड,तुलशिराम पालिमकर, गेंदाजी गायकवाडआदीसह गावातील नागरिक रुग्ण यावेळी उपस्थित होते.