कंधार ; हनमंत मुसळे
कंधार नगरपालिकेच्या दंडेलशाही कर्मचारी यांच्या विरोधात,वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली असून
वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे,
वंचित बहुजन आघाडी चे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष,शिवाभाऊ नरंगले
यांच्या नेतृत्वाखाली अलुतेदार, बलुतेदार व छोट्या व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी लॉकडाऊनच्या विरोधात,व नगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या दडपशाही विरोधात,कंधार नगरपरिषदेच्या समोर
“बोंब मारो आंदोलन” करण्यात येणार आहे.
सोमवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वाजता कंधार शहरातील व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी व छोट्या व्यापाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.