किनवटच्या मनसे शहर प्रमुखाने केली आत्महत्या

राज साहेब मला माफ करा..!

KINWAT किनवट

राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण सुरू आहे. आणि हे दोन्ही माझ्या जवळ नाही. “जय महाराष्ट्र, जय राज साहेब, जय मनसे” अशी सुसाईड नोट लिहून नांदेड मधील किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

सध्या राजकारणात घराणेशाही बरोबरच धन-दांडग्या लोकांचीच अधिक गर्दी आहे. जाती-पातीच्या राजकारणात समाज कार्यातून सर्व-सामान्य, अल्पसंख्याक समाजातून पुढे येण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचे अनेक प्रकरण समोर येत असताना किनवट येथील मनसेचे शहराध्यक्ष सुनील आनंदराव ईरावार यांनी रविवार रोजी पैसा आणि जात या समीकरणात आपला टिकाव लागत नसल्याने हताश होऊन आत्महत्या केली आहे.अत्यंत मनमिळाऊ, कुशाग्र बुद्धी व अत्यंत संयमी असलेल्या सुनील ईरावार यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.#yugsakshilive.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *