कोरोना आणि अंगणवाडी सेविका

कोरोना आणि अंगणवाडी सेविका .

सातारा ;  

२०१९ डिसेंबरला उद्भवलेल्या कोरोना महामारी आपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत गेलेली दिसते .येवलुसा विषाणु जगभरात धुमाकुळ घालतो .मृत्यूचे तांडव सुरू होते. औषध, उपाय या भविष्यातील गोष्टी ठरतात .काळजी घेणारी टीम ,राबणारे हात, प्रशासनाचे चालवणारे राज्यकर्ते, अंमलबजावणी करणारे प्रशासन, अधिकारी संरक्षण करणारे, पोलिस प्रमुख विभाग या सर्वांची धावपळ करणारा हा आजार. 2020 जानेवारीपासूनच या आजाराची परिक्रमा वाढत राहिली.


 जगभरात सर्वत्र दळणवळण व्यवस्था आणि फिरण्याची ठिकाणे बंद करण्यात आली .प्रत्येक ठिकाणी चेकिंग, भिती, तपासणी ,संशय, आजार ,लक्षण, आणि वाढता आकडा याची चर्चा सुरू राहिली .फेब्रुवारी अखेरीस या रोगाचे भारतामध्ये दिसण्याचे प्रमाण सुरू झाले .रोगी सापडू लागले .काळजी घेतली जाऊ लागली. संरक्षण दिले जाऊ लागले. शोध घेतला जाऊ लागला यासाठी प्रशासन सज्ज झाले. डाउन म्हणजेच सर्वत्र बंद ही हाक जनमानसात पर्यंत पोहोचू लागले. आणि सोळा मार्चपासून सर्वत्र  टप्पे ठरवण्यात आले .या ठरविलेल्या 14, 28 ,20, 21 ,25, दिवसांच्या या काळामध्ये विविध टप्प्यावर विविध ठिकाणी चालू बंद चालू बंद असे प्रकार घडू लागले ,पोलीस प्रशासन , महसूल विभाग,डॉक्टर्स, सफाई कामगार ,अंगणवाडी सेविका ,आशाताई,सामाजिक कार्यकर्ते ,संस्था यांनी सर्वत्र आपापल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न आणि पराकाष्टा केली. त्यामुळे काही अंशी सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक घरातील व्यक्तीचा संरक्षण करणं सोपं झालं, काळजी घेणं सोपं झालं. 

जिथे जिथे पेशंट सापडतील तिथं तिथं कँटोन्मेंट आपत्कालीन सेवा, आपत्कालीन विभाग अशा प्रकारची बंधनं तयार करून, साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू झाले .हा जगभरातला प्रश्न असून यावर कोठेही कसलेही ही एका कोणा वर्गाचे कसलेच हस्तक्षेप नाहीत याची मात्र अगदी तळातल्या लोकांना खात्री पटली. सुरू झालं आजही ते सुरू आहे. कामांमधील कसलीच दिरंगाई होत नाही. अठरा-अठरा तास कर्मचारी काम करत आहेत.

 अधिकारी यांच्यासाठी राबत आहेत. तरीही आज रोगाचा आकडा वाढतानाच दिसतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजातील प्रत्येक प्रशासनाच्या कार्याचा, सगळ्यात तळाचा टप्पा म्हणजे आशा आणि अंगणवाडी सेविका .आज खऱ्या अर्थाने या तळातल्या महिलांच्या कामाच्या सर्वात मोठा टप्पा या आपत्तीमध्ये दिसून येतो .अंगणवाडी गावाचे विकासाचे पहिले दार म्हणून ओळखली जाते .आज कोरॉना महामारी मध्ये शाळा, महाविद्यालय ,ग्रामपंचायत आणि मोठ्या इमारती केअर सेंटर म्हणून ताब्यात घेतल्या गेल्या. यातून बचावली ती फक्त अंगणवाडीची इमारत. या इमारतीला मी एक अंगणवाडी सेविका म्हणून मंदिरच समजते कारण खऱ्या अर्थाने आज हक्काची जागा ही अंगणवाडी इमारत ठरली आहे .


गावातील लहान मुलांचे लसीकरण, पोषण आहार आणि आपत्तीचा समन्वय करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणून अंगणवाडी कडे पाहिलं जातं .आलेली मदत कार्य त्याचं नियोजन, अंमलबजावणी आणि वाटप या गोष्टी या माझ्या अंगणवाडीच्या मंदिरातच सुरू आहेत. मोठ्या मंदिरांना आज कुलुपे लागलेली आहेत. कोणी म्हणतं “देवा “कुठे आहे तुझं देवपण? मी म्हणते , मग जर देवच नाही ना, निदान माणसं सांगतात ते तरी एकावे ना? बाहेर पडू नये म्हणून तर हे आपलं नजर चुकाऊन. फिरतं आहेत. जमावं करूनका. अस असताना कशाला हवं जमावात जाणं? आणि या अंगणवाडी इमारतीमध्ये असणाऱ्या या महिलांच्या रूपात का आपल्याला ग्रामदैवत दिसू नये? मंदिर बंद ,अंगणवाडी सुरू, शाळांमध्ये संरक्षणाचे कार्य सुरू, दवाखाने केअर सेंटर म्हणून आजही सुरूच आहेत .पोलीस स्टेशन ,हे एक मंदिरा पेक्षा अधिक जवळचं ठिकाण ठरत नाही काय? आणि या काम करणाऱ्या व्यक्तींना एका दौऱ्यात होऊन ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणारा, समस्त तहसील महसूल आणि प्रशासन विभाग यांना देवतांची विविध रूपे का समजू नये.

 या नैसर्गिक आणि जैविक आपत्तीमध्ये या माणसांनी केलेले कष्ट आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत. रुग्णांचीसाखळी तोडताना ,या माणसांनी जीवाची परवा न करता, कुटुंबाचा विचार न करता ,स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता ,सगळ्या जनतेसाठी कर्माचे योगदान दिले. अशीच मी एक अंगणवाडी सेविका, माझ्या विभागाबद्दल काही ही बोलू इच्छिते. या महिला निरोप आल्या आल्या खात्रीसाठी धडक जाऊन पोहोचतात. आजुबाजूची माहिती घेतात. आपल्या प्रशासनाला कळवतात. आणि नेमके ठिकाण ,नेमका माणूस शोधून देतात .त्याच्या प्रवासाच्या इतिहासाची माहिती घेतात. संपर्क नंबर, लक्षणे याबाबत आपल्या विभागाला काही तासातच कळवतात. विकास कार्यातील कोणत्याही टप्प्यावर ही अंगणवाडी सेविका पोहोचते .भरण पोषण, दैनंदिन लिखाण, गृहभेटी आणि उपाय योजना याची अंमलबजावणी करताना ,काही तासातच या आपल्या कामात सक्रिय राहतात.

 अत्यंत तुटपुंजा  मानधनावर या महिला काम करताना दिसतात.. संरक्षणाची साधने जसे की मास्क, स्यानीटायझर, पीपीटी किट ,छत्री ,बूट, क्लोज, हेड कॅप यांची गरज असताना हे साहित्य शब्दशहा पोहोचू शकते यावर मात्र प्रश्नचिन्ह? तपासणीसाठी आवश्यक ऑक्सी मिटर, टेंपरेचर मशीन  , बीपी शुगर या लोकांच्या महत्त्वाच्या गोळ्या, जखमांवर ची सोल्युशन या गोष्टी हाती असतात .असायला हव्यात. परिसरांमध्ये फिरताना लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं त्यावेळी हि सेविका कमकुवत ठरते. शासनाच्या प्रत्येक गोष्टी या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये पोहोचतील तर काम करताना कसलीच अडचण येणार नाही .अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अंगणवाडी गावचा आरसा .गाव कसा आहे हे अंगणवाडीच्या इमारतीवरून दिसून येतं ..राज्यकर्त्यांना, प्रशासनाला ,धोरण राबवणा रे यांना माझी कळकळीची विनंती.

अधिकारी या नात्याने आपण सोयीसुविधा आणि कार्यपद्धती शैक्षणिक गुणवत्ता आणि कामाची तळमळ या गोष्टी विचारात घेऊन या अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस महिला आशा स्वयंसेविका कार्यकर्ती या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ची गरज आहे. त्यांच्या वैयक्तिक समस्या ,आर्थिक प्रश्न ,वारसांना शासन सेवेमध्ये काही ही निर्धारित जागा, सेवानिवृत्तीनंतर किमान मानधन, आरोग्याच्या मोफत सुविधा, याबरोबर एस टी महामंडळ यांचेमार्फत 50 वर्षा वरील कार्यकर्तीचे ओळखपत्र ग्राह्य धरून मोफत प्रवास या गोष्टी अत्यंत गरजेच्या वाटतात. किमानपक्षी त्या व्हायलाच हव्यात, असा माझा आग्रह असेल. या अंगणवाडी सेविका मधून प्रमोशनच्या कुठल्याही संधी निश्चित होताना दिसत नाहीत. शैक्षणिक गुणवत्ता, कामाचा अनुभव ,काम करण्याची धडपड, वैयक्तिक प्रमाणपत्र, विविध स्तरावरील सहभाग ,या गोष्टी विचारात घेऊन प्रमोशनच्या संधी मिळण्याबाबत हा लेखाजोखा नजरेआड करून चालणार नाही. 

अत्यंत हुशार होतकरू उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त आणि कार्यतत्पर महिलांचा त्वरित सर्वे करून अशा महिलांना शासनाच्या प्रमोशन च्या पदांवर थेट नियुक्ती आदेश मिळण्यास काहीच गैर आहे असे वाटत नाही. मी अंगणवाडी सेविका मला माझ्या कामाचा अभिमान आहे. या कारणाने दाखवून दिले. खऱ्या अर्थाने मुंगी सारख्या कनकण जमा करणाऱ्या या कार्यकर्त्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्रिवार मानाचा मुजरा आणि यांच्या कार्याबाबत मनापासून धन्यवाद .या को विड योद्याना शासनाने योग्य तो न्याय संधी सुविधा गौरव उपलब्ध करून द्यावा आणि या महामारी मध्ये ज्या सेवा बजावताना मृत्यू पावल्या अशांच्या वारसांना सहकार्य करावे. जाहीर केलेली आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या या सामाजिक कार्यातून उपकृत होऊ असे मला वाटते .त्याचबरोबर मी अंगणवाडी सेविका म्हणून एक शब्द संदेश देते “चला सुरुवात करुया बदलाची ,मनामनात नाती सांभाळून ठेवण्याची” घरी रहा सुरक्षित रहा “जगण्यासाठी. आयुष्य पडले हो मनासारखं वागण्यासाठी. 

शब्द सम्राज्ञी .,.,
सौ जयश्री गणेश माजगावकर. अंगणवाडी सेविका, पोलीस वसाहत अंगणवाडी मेढा. तालुका जावली जिल्हा सातारा.९११२३४४०५७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *