वैजनाथराव सादलापुरे यांच्या कडून पत्रकार धोंडीबा बोरगावे यांचे अभिष्टचिंतन..

कंधार ; प्रतिनिधी

   फुलवळ ता. कंधार येथिल भुमिपुत्र तथा दैनिक सकाळचे पत्रकार धोंडीबा बोरगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी शासकीय गुत्तेदार तथा फुलवळ चे भूमिपुत्र वैजनाथ सादलापुरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.

  आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय देणारे व समाजाचे प्रश्न हिरीरीने आपल्या वृत्तपत्रात मांडणारे व मरगळ आलेल्या त्या त्या संबंधित यंत्रणेला जागे होण्यास भाग पडणारे दैनिक सकाळचे पत्रकार धोंडीबा बोरगावे हे नेहमी सर्वात मिसळून राहणारा सामान्य परिस्थितीतुन आपल्या स्वकर्तुत्वाने एक होतकरू पत्रकार म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

  समाजातील समस्यांची  जाण असलेल्या पत्रकाराच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन फुलवळ येथिल भुमिपुत्र तथा शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांनी धोंडीबा बोरगावे यांचे पेडा भरवून व शाल , श्रीफळ देवून अभिष्टचिंतन केले.

 यावेळी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन चे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक नारायणराव पटणे यांच्या सह विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटनेच्या पदाधिका-यांनी तसेच ग्रामपंचायत फुलवळ येथिल सर्व सदस्य यांच्या वतिने ही शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *