२ ऑक्टोबर लालबहाद्दूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती , पण योगायोग असा की माझाही जन्म २ ऑक्टोबर रोजीच झाला आणि या अविस्मरणीय दिनाची माझ्या जीवनात आनंद देणारी भर पडली.
निमित्त जन्मदिवसाचे तसे आपणा सर्वांकडून मला शुभेच्छा रुपी प्रेम , आशीर्वाद , प्रेरणा चा ओघ दिवसभर चालूच राहिला त्यामुळेच म्हणतोय धन्य झालो तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार अन कसे-कुठे फेडावेत तुमचे उपकार..
२ ऑक्टोबर रोजी माझ्या जन्मदिवसानिमित्त आपण अनेकांनी प्रत्यक्ष , अप्रत्यक्षपणे भेटून तर काहींनी फेसबुक , वॉट्सअप , शोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यातील जिव्हाळ्याप्रति प्रेम , आशीर्वाद व्यक्त करत शुभेच्छारुपी अभिष्टचिंतनाचा वर्षाव केलात . विशेष करून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , कंधार-लोहा मतदार संघाचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे ,
सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा मराठी सिने अभिनेते एकनाथ ऊर्फ अनिल मोरे , मन्याड फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव पवार , कंधार-लोहाचे शिवसेना नेते ऍड मुक्तेश्वर भाऊ धोंडगे , जि. प. सदस्य ऍड विजयकुमार धोंडगे , जि. प.सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर , जि. प.सदस्या प्राणिताताई देवरे-चिखलीकर , पं. स. सदस्य उत्तमराव चव्हाण ,
मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश दादा कांबळे , गोदतीर समाचार चे प्रमुख तथा मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा माजी अध्यक्ष केशव पाटील घोणसे , शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे , नारायणराव पटणे , फुलवळ चे सरपंच प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे , पं.स.सदस्य उत्तम चव्हाण ,माजी सरपंच बालाजी देवकांबळे ,
दत्ता डांगे , गणेश मंगनाळे , ग्रा.पं. सदस्य प्रवीण मंगनाळे , मन्याड लंच होम चे मालक शिवाजी बोरगावे ,महेश मंगनाळे, संतोष बोरगावे , आनंदा पवार , फुलवळ चा पहिला इंडियन नेव्ही सूरज होणराव , सुदर्शन होणराव ,युगसाक्षी परीवार यांच्या सह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी , कार्यकर्ते ,
विविध संघटनांचे पदाधिकारी , मित्रमंडळी , ग्रामस्थ तसेच फेसबुक मित्र , वॉट्सअप मित्र समस्त कुटुंबीय , पाहुणे रावळे सहित अनेकांनी भरभरून प्रेमरूपी शुभेच्छा देऊन मला एक नवीन ऊर्जा देत प्रेरणा दिल्या.
आपल्या सर्वांचे आभार तरी कसे व्यक्त करावेत यासाठी माझ्याकडे शब्दच नसून मी आपल्या स्नेहापोटी सर्वांच्या कायम ऋणातच राहणे पसंत करतो , आणि आपला स्नेह-जिव्हाळा माझ्याप्रति असाच असावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो.
धोंडीबा बोरगावे ,पत्रकार दैनिक सकाळ ,फुलवळ,ता.कंधार जि.नांदेड