कंधार ; प्रतिनिधी
कंधार मधील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली प्रमाणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी हेल्थ क्लिनिक ची सुरुवात केली गेली. तसेच संस्थेचे अध्यक्ष ऍड.बाबुराव पुलकुंडवार साहेबांनी विद्यार्थ्यांचे फुलांचे पुष्प व मास्क, सॅनिटायजर देऊन स्वागत केले.
शाळेतील मुख्याध्यापकांनी डॉ.तक्षशिला बाळासाहेब पवार (पवार हॉस्पिटल कंधार) यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. इयत्ता आठवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली काही विद्यार्थी यांना ताप सर्दी असेही लक्षणे आढळून आली व त्या विद्यार्थ्यांना दोन दिवस औषधे घेऊन आराम करण्यासाठी सल्ला दिला.
तसेच शाळेतील मुख्याध्यापकांनी डॉ. तक्षशिला पवार यांना पुढील काही दिवस त्याच्या सोयीनुसार शाळेच्या वेळेत येऊन विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी करावी विनंती केली. तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री लुंगारे सर यांनी डॉ. तक्षशिला पवार यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.