नवरात्र काव्य जागर उपक्रम
दि.९-१०-२०२१
रेणुका माता
प्रसेनजिताची कन्या
परशुरामाची माता
जमदग्नीऋषी भार्या
जगदंबा रेणुका माता
यादवांनी निर्मिला गड
रेणुकामातेच्या मंदिरा
सहानथोरांची कुलदेवता
सोहळा लौकिक दसरा
तांदुलमुख स्वरूपिनी
नयन गहिरी सागरजळी
वात्सल्य माया मनोहरी
अढळभाव भक्तातळी
स्थिर माहुरगडवासिनी
ओजस पंकज निर्मला
अनघट अमूर्त चित्तीवेधी
भक्तीभाव निरंतर रमला
श्रद्धेचं शक्तीपीठ अढळ
कल्पवृक्षाची तव सावली
चैतन्माचे स्पुरण देई
माझी रेणुका माउली
अनिता दाणे
नांदेड.