कंधार ;
प्रियदर्शनी नगर कंधार येथिल नागरीकांचे अस्वच्छतेमुळे
आरोग्य धोक्यात आले असून नगर पालीका प्रशासनाने तात्काळ या नगराची स्वच्छता करावी असे निवेदन सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी संयुक्त ग्रुप कंधार च्या वतिने देण्यात आले आहे.
प्रियदर्शनी नगर येथे घंटा गाडी चालू करणे ,पिण्याचे पाणी चार दिवसा आड आहे ते दोन दिवस आड पाणी सोडणे. प्रियदर्शनी नगर येथील नाल्या 15 प्रत्येकी दिवसानंतर स्वच्छ करणे.
आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांना
संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, रेड पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राज मळगे , विजेंद्र कांबळे,बाळा गडंबे, प्रकाश नवघरे, माधव वाघमारे,अविनाश गडंबे,बबलु कांबळे,जिवन भिसे आदींची उपस्थिती होती.