डेमोक्रॅटिक रिपाई च्या मुंबई प्रदेश युवाध्यक्ष पदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्ष पदी सुधीर धस यांची निवड

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याच्या मुंबई प्रदेश युवाध्यक्षपदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्षपदी सुधीर धस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

रिपब्लिकन भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्या शिफारस व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड व विधी विभाग प्रदेशाध्यक्ष ऍड नितीन माने यांच्या अनुमोदनाणे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते सदर निवड करण्यात आली.

भाई राहुल जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकित वंचित कडून कांदिवली मतदारसंघात निवडणूक लढवली होती, त्यांना यावेळी 33 हजाराच्या वर मताधिक्य प्राप्त झाले होते.

नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुधीर धस हे केमिकल इंजिनीअर असून परदेशात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, पक्षाच्या माध्यमातून आधुनिक आणि उच्च शिक्षण बांधणी मांडणी व शासनाच्या संबंधित योजना व मार्गदर्शन करून भारतातील नवीन पिढीला विलायतेत पाठविण्यास एक सूत्रबद्ध कार्यक्रम आखनार आहेत जेणेकरून मागास व अति मागासवर्गीयांना संविधानिक शिक्षणाचे फायदे मिळतील व सुशिक्षित समाज घडेल व देशाच्या जडण घडण ला हातभार लागेल.

भाई राहुल जाधव आणि सुधीर धस यांच्या निवडीमुळे नवचैतन्य आले असून अन्याय अत्याचार विरोधी कार्यप्रणाली व शैक्षणिक व स्वयंरोजगार आदी बाबत कलमी कार्यक्रम राबवून समाजाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page