कंधार: प्रतिनिधी
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची
कार्यकारिणी बाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कंधार येथिल अनिल भागवत वट्टमवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या सन 2021-2024 या कालावधीसाठी महासभेच्या कार्यकारिणीवर सदस्य या पदावर निवड करण्यात आलेली आहे.
महासभेच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे निवडपत्र अनिल वट्टमवार यांना देण्यात आले असून या निवड पञावर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार ,महासचिव गोविंद लक्ष्मणराव बिडवई ,कोषाध्यक्ष सुभाष बालाजीराव कन्नावार यांची स्वाक्षरी आहे
या निवडी बदल अनिल वट्टमवार यांचे सर्वच स्थरारून अभिनंदन केले जात आहे.