कंधार : प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य मोफत स्त्री रोग निदान शिबिर व उपचाराला आज मंगळवार आज २६ ऑक्टोबर रोजी महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे होते तर उद्घाटक म्हणून नगरसेवक शहाजी नळगे तर
प्रमुख उपस्थित म्हणून संजय भोसीकर,गणेश कटेवार, मन्नान चौधरी,बाबुराव केन्दे,अँड.विजय धोंडगे,संजय पाटील कर्हाळे,शिवदास पाटील धर्मापुरीकर,मनोहर पा. भोसीकर आदीची उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन राजकुमार केकाटे व
सौ.अम्रपाली केकाटे यांनी केले होते.
मान्यवरांचा सत्कार केला . कार्यक्रम चे सूत्रसंचलन दत्ताभाऊ कारामुंगे यांनी केले तर आभार राजकुमार केकाटे यांनी .