आर्य वैश्य समाजाच्या वतीने कंधार येथे रक्तदान शिबीर संपन्न

कंधार  ; प्रतिनिधी

कंधार येथे आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या 57 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन व कोविड लसीकरणाचे आयोजन आज दि.२६ ऑक्टोबर रोजी नगरेश्वर मंदिर कंधार येथे  संपन्न झाले.

त्याप्रसंगी गुरुगोविंद सिंगजीब्लड बँक.नांदेड यांना बोलावले होते. त्या टिमचे प्रमुख लोणे आनंद जनसंपर्क अधिकारी यांच्या नियोजनाखाली रक्तदान संकलित करण्यात आले .

त्याप्रसंगी कंधार शहरातील प्रतिष्ठित नागरिक व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते यावेळी कंधार चे नगरसेवक शहाजी नळगे , नगरसेवक विनोद पापिंनवार , नगरसेवक गणेश कुंटेवार , कृष्णा पापीनवार , गंगाप्रसाद  यन्नावार , डॉ दिनकर जायभाये , नामदेव पटणे , शंकर गिते  , विकी बिडवई , कैलास मामडे  , मोरे गणेश , प्रफूल गादेवार , अनिल फरकंडे ,  राजू मामडे , हनुमंत मेने , भोस्कर सुरज ,  बाळू कुंभारगावे , दिपक गरुडकर , नारायण श्रीपतवार ,  विलास मुखेडकर , राम बामनवा , संजय सुवर्णकार , नामदेव सुवर्णकार या रक्तदात्यांनी रक्त दान केले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंधार आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष कृष्णा चालीकवार तसेच नूतन जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवा भाऊ मामडे व अँड सागर मुखेडकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वटमवार यांनी नियोजन करून कार्यक्रम संपन केला.

यावेळी महीलामध्य रोहिणी ताई गंजेवार ,  कला सरलाताई महाजन  , अनिता मामडे , सौ पदमवार  , सो मुखेडकर सुचिता ,सौ माधुरी मुखेडकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *