कंधार ग्रामीण रुग्णालयाने ओलांडला २२ हजार २५७ लसीकरणाचा टप्पा ; वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी


कंधार ग्रामीण रुग्णालयात सलग ७५ तास लसीकरण मोहिमेत दि .२१ आक्टोबर ते २४ आक्टोबर या कालावधीत पहिला डोस ९४५ व दुसरा डोस ४०९ असे जवळपास एकूण एक हजार ३५५ इतके म्हणजे सुमारे ९५%काम एवढे लसीकरणाचा टप्पा पार पडला अशी माहिती कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी दिली.

कंधार शहरात जवळपास
२२ हजार २५७ सतावन्न डोसेस चा टप्पा आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कल्पनेतून सलग ७५ तास विशेष लसीकरण मोहीम सत्र नांदेड जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रा.प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय , सर्व ग्रामीण रुग्णालय , मेडिकल कॉलेज , आयुर्वेद रुग्णालय , महापालिकेचे सर्व रुग्णालय या ठिकाणी सलग ७५ तास विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते .

कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली कंधार शहरातील सर्व वॉर्ड निहाय मतदार यादी घेऊन BLO यांची मदत घेऊन सर्व शिक्षक ,नगर परिषद चे कर्मचारी ,व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी कंधार शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन तेथील नागरिकांना लस घेण्यास प्रवृत्त करून त्यांना लसी बद्दलच्या गैरसमज याविषयी माहिती देऊन त्यांना लस डोर टू डोर जाऊन लसीकरण करण्यात आले.

कंधारचे तहसीलदार यांनी सर्वांना सूचना देऊन महसूल विभागातील BLO यांना आदेशीत करून त्यांना वॉर्डात मतदार यादी घेऊन प्रत्येक वॉर्डात जाऊन या लसीकरण सत्रास अभूतपूर्व असा प्रतिसाद सर्व नागरिकांकडून मिळाला .

यामध्ये शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांनी मोलाचे काम केले .

कंधार ग्रामीण रुग्णालयाचे सर्व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी , शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग विशेष आरोग्य ७५ तासांनंतरही लसीकरण सुरूच कंधार ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आरोग्य मोहिमेच्या तब्बल ७५ तासांनी ही कंधार ग्रामीण रुग्णालयात मिशन कवचकुंडल या प्रतिसाद मिळवून घेत आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण रविवारी उशिरापर्यंत सुरूच ठेवले .

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस .आर.लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार शहरा अंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक जागृती व लसीकरण स्थानिक वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.आर.लोणीकर व त्यांचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत .

कंधार शहरातील तसेच कार्यक्षेत्रातील सर्व वॉर्डनिहाय जाऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे .

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ . विपीन इटनकर व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मा.निळकंठ भोसीकर यांनी जिल्हाभरात २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवचकुंडल या मोहिमेंतर्गत विशेष अभियान राबविण्याचे आदेश दिले होते .

सर्व विभागांचे सहकार्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बालाजी शिंदे , महसूल प्रशासन , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी केली .

कंधार शहराची लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सुमारे २३ हजार २७४ एवढे होते. त्यापैकी कंधार शहरात जवळजवळ २२ हजार २५७ नागरिकांचे १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण झाले आहे .कंधार शहरातील सर्व नागरिकांना किमान एक डोस देऊन ही मोहीम यशस्वी केली.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.आर. लोणीकर यांच्या आदेशानुसार कंधार कार्यक्षेत्रातील संभाजी नगर,रमाई नगर,भीम गड, रघुनाथ नगर,वाहतूक नगर, अभिनव नगर,भवानी नगर,विजय गड, वेंकटेश नगर,महात्मा फुले हौसिंग सोसायटी, वडार गल्ली,सुलतान पुरा, छोटी गल्ली,गायकवाड गल्ली,दर्गापुरा ,नळगे गल्ली,रॅम मंदिर गल्ली गांधी चौक, हातई पुरा ,फुले नगर रंगार गल्ली,खाटीक गल्ली,गवंडी पार ,साठे नगर,प्रिय दर्शनी नगर,सिद्धार्थ नगर,विकास नगर ,बोद्ध द्वारवेस, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, राम रहीम नगर, मुक्ताई नगर,मल्हार नगर,सहयोग नगर ,स्वप्ननभूमी, बस स्थानक, वैदू गल्ली,गोसावी गल्ली इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात आले .

स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपले शहर १०० टक्के लसीकरण होऊन आपल्या शहरात यापुढे कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

तसेच कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ अधिकारी व कर्मचारी यांची विशेष टीम तयार केले . त्या टीम मध्ये नियंत्रण अधिकारी म्हणून डॉक्टर यांची निवड करण्यात आली व लस टोचक परिचारिका व डाटा एन्ट्री इत्यादी लोकांची टीम तयार करून लसिकरणाच नियोजन केले होते.

त्यामध्ये काम करण्यात ग्रामीण रुग्णालयाचे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) यांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी व NCD विभागाचे परिचारिका व समुपदेशक,ICTC चे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,समुपदेशक,RKSK चे समुपदेशक,RBSK टीम चे सर्व वाहन चालक ,IPHS स्टाफ व फार्मासिस्ट, परिचारिका व अधिपरिचरिका, (RBSK) चे वैद्यकीय अधिकारी,डॉ. एस.एस.मोरे,डॉ. अरूण कुमार राठोड,डॉ. गजानन पवार,डॉ.. शाहीन मॅडम,डॉ. नम्रता ढोणे, डॉ. उजमा तबसूम,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. गुडमेवार ,डॉ. निखत फातेमा, डॉ. बंडेवार मॅडम व कर्मचारी श्री शंकर चिवडे,श्री.लक्षमन घोरपडे,श्रीमती.सुनीता वाघमारे, प्रियांका गलांडे,मैलारे सिस्टर, भुरके सिस्टर ,ज्योती तेलंग, ज्ञानेश्वरी गुट्टे,

प्रशांत कुमठेकर, आशिष भोळे,अरविंद वाटोरे,प्रदीपकुमार पांचाळ,राजेंद्र वाघमारे, यशवंत पदरे ,हणमंत घोरबांड,संगेवार सिस्टर, इनामदार सिस्टर,जाभाडे सिस्टर चाटे सिस्टर,कबीर सीटर ,पार्वती वाघमारे सिस्टर, सरवर शेख, व वाहन चालक सुनील सोनकांबळे, भीमा आप्पा हमपल्ले, युसुफ सय्यद, पद्माकर राहिरे,दुरपडे अशोक,दिपक फुलवळे,व ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. महेश पोकले सर यांनी सर्व टीम यांच्या वरती नियंत्रण ठेऊन नियोजन करून कोणती टीम कोणत्या वॉर्डात पाठवायची व कोठे लाभार्थी आहेत ते त्यांनी योग्य प्रकारे नियोजन करून पाठवत असे सरांच खूप मोठं योगदान आहे.

यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी सर्वांचे खूप खूप परिश्रम घेतले आहेत.

तसेच 27 ऑक्टोबर पासून परत दुसरे 75 तासाचे लसीकरण अभियान ही हाती घेतले आहे, यात ही जनतेने उस्फुर्त पने सहभागी होऊन, अभियान यशस्वी करावे, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *