अहमदपूर ( प्रतिनिधी ) संत सेवालाल महाराज यांचे वंशज ,पोहरादेवी येथील संत जितेंद्र महाराज यांनी अहमदपूर येथे धावती भेट दिली.
बारामतीहून पोहरादेवीकडे जातांना अहमदपूर येथील भेटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी जितेंद्र महाराज यांचे स्वागत केले. त्या प्रसंगी लातूर जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवानंद हेंगने तात्या,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, बंजारा परिवर्तन अभियानाचे नाथराव राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते चंद्रशेखर भालेराव, बंजारा समाज सेवा संस्थेचे राज्य उपाध्यक्ष एन डी राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते विकास राठोड, पुन्य नगरीचे पत्रकार गजानन भुसारे, तरुण भारतचे पत्रकार सुरेश डबीर आणि प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जितेंद्र महाराज यांनी या भेटीमध्ये बंजारा समाजावरील अन्याय अत्याचारावर सरकार दरबारी वाचा फोडण्यासाठी आणि समाज जाग्रती करण्यासाठी राज्याचा दौरा काढलेला असून संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी विचार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विचारांची पेरणी राज्यभर चालू केली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले की बंजारा समाजाला दिलेले संविधानीक अधिकार आज बंद केले जात आहेत. समाजाचे नौकरीतील आरक्षण बंद करण्याचे षड्यंत्र न्यायालयाच्या माध्यमातून रचले जात आहे. या बाबतीत जन सामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या धावत्या भेटीत महाराजांनी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, चाकूर – अहमदपूर विधान सभेचे विद्यमान आमदार आणि समाज परिवर्तन आंदोलनामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्ते यांना पोहरादेवी येथे येण्याचे आमंत्रण दिले.