कंधार ;
गोगदरी ता. कंधार येथील उत्तम आयनाथ कल्याणकर वय वर्ष ५५ यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कंधार शाखेत नविन कर्ज घेण्यासाठी बँकेत सुमारे तीन महिण्यापासुन चकरा मारीत असतांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणारे बँकेचे फिल्ड ऑफिसर व इतर कर्मचाऱ्यानी अपमानाची वागणुक दिल्यामुळे बँक अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासास कंटाळुन दि1 नोव्हेबर रोजी आत्महत्या केली असून त्याच्या अत्महत्येस जबाबदार स्टेट बॅक ऑफ इंडीया कंधार शाखेतील बॅक अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण व नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांनी पोलीस निरीक्षक कंधार यांच्या कडे निवेदना द्वारे आज मंगळवार दि 2 नोव्हेबर रोजी केली आहे.
पालीस स्टेशन कंधार येथे फिर्याद मयताची पत्नी सुशिलाबाई उत्तम कल्याणकर यांनी दिली आहे. तेव्हा मयत पत्नीच्या फियादी वरुन संबधीत बँक अधिकारी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावे यावे अशी निवेदनाद्वारे मागणी पं.स. सदस्य उत्तम चव्हाण व नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांनी केली आहे.