देगलूर -बिलोली व दादर व नगर हवेली विजया चा कंधार येथे महाविकास आघाडी कडून फटाके फोडून व साखर वाटून आनंदोत्सव.

कंधार; प्रतिनिधी

देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर हे विजयी झाल्याबदल
तसेच दादर व नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीत शिवासेनेच्या उमेदवार श्रीमती कलाबेन डेलकर यांनी विजय संपादीत करून शिवसेनेने केलेल्या सिमोल्लंघनाचा आनंद व्यक्त करत कंधार येथे महाविकास आघाडीच्या वतीनी आज मंगळवार दि 2 नोव्हेबर रोजी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

या वेळी शिवसेना लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,प. स. सदस्य उतम चव्हाण,नगरसेवक आरूण बोधनकर, काॅग्रेंस पक्षाचे शहराध्यक्ष हमीद सुलेमान, डॉ. दीपक बडवणे, सुधाकर अण्णा कांबळे, रामराव पवार नगरसेवक मन्नान चौधरी, सुरेश राठोड, अजिंक्य पांडागळे, सुरेश कल्हाळीकर, अजय मोरे, स्वप्नील परोडवार, ऋषीकेश बसवंते,संरपंच सतिश देवकत्ते, सामाजिक कार्यकर्ते सचिन पेठकर,

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव केंद्रे,शहराध्यक्ष राजकुमार किशनराव केकाटे,दता कारांमुंगे,शेख अरबाज,तारकेश तपासे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंधार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, विर शिरोमणी महाराणा प्रताप, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे कार्यकर्त्यानी एकमेकांना गुलाल लाऊन तसेच फटाके वाजवून व साखर वाटून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *