नांदेड;
भाजपा महिला मोर्चा गेल्या दोन वर्षांपासून नेहमी चर्चेत आहे. कुठलाही सामाजिक उपक्रम असो पक्षाशी संबंधित कार्यक्रम असो किंवा कोरोणा काळातील कार्य असो नेहमीच अग्रस्थानी राहिलेला हा भाजपा महिला मोर्चा नांदेड चा आहे.
कोरोना काळात अनेक लोकांना आर्थिक हानी सहन करावी लागली आहे, अजूनही काही कुटुंब सावरले नाहीत त्यामुळे नांदेडच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे यांनी पुणे येथील एका कंपनीशी करार करून आपल्या नांदेड जिल्ह्यातील महिला आत्मनिर्भर बनल्या पाहिजे,
स्वतः स्वावलंबी बनले पाहिजे, भाजपा महिला मोर्चा काम करणारी प्रत्येक पदाधिकारी स्वतःच्या पायावर उभी टाकली पाहिजे ,महाराष्ट्रात नांदेड चा महिला मोर्चा एक आगळा वेगळा कामाच्या माध्यमातून ठसा उमटवला पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आज दहा महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी जवळपास 90 हजार रुपये किंमत असलेल्या मशनरी मिळवून दिल्या.
या माध्यमातून महिलांना वीस ते पंचवीस हजार रुपये महिना उत्पन्न प्राप्त होणार आहे. या माध्यमातून काही महिला स्वतःचा व्यवसाय करणार आहेत व काही महिला इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.
म्हणजे पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून महिला उद्योजक बनणार आहेत ही विशेष बाब आहे.
नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या वेगवेगळ्या युक्तीने प्रेमळ स्वभावाने आम्हाला काहीतरी करायला मिळतेय आम्ही उधोजक बनतोय याचा महिलांमध्ये आनंद दिसून येत आहे.