लसाकम”च्या वतीने गौरव गुणवंतांचा

नांदेड; प्रतिनिधी

आज बुधवार दिनांक ०३नोव्हेंबर २०२१ रोजी नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय पूर्व परीक्षेत(नीट) परीक्षेत पात्र ठरलेल्या कु.निकीजा केशव मेकाले ५१५,शुभम नामदेव कपाळे ५१४, शिवराज सखाराम जांभळेकर ५०० आणि अभिषेक नामदेव खंदारे या प्रज्ञा आणि प्रतिभासंपन्न गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करून या MBBS साठी पात्र ठरलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर प्रेरणेची थाप द्यावी या उद्देशाने क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ”लसाकम” जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने त्यांच्या घरी जाऊन या गुणी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला..

या सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे,”लसाकम”चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सरचिटणीस डॉ. अशोक झुंजारे,कोषाध्यक्ष शंकर नामवाडे,पांडुरंग सूर्यवंशी,दिलीप वाघमारे,सखाराम गजले,बालाजी गुंडले,उत्तम बाभळे,दिगंबर वाघमारे, उदय देवकांबळे,शिवाजी मोरे आणि बळीराम कांबळे आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *