शेतक-यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या SBI बँकेच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करा- कंधार तालुका संभाजी ब्रिगेड ची तहसिलदारांना मागणी

कंधार; प्रतिनिधी

गोगदरी ता. कंधार जि.नांदेड येथील उत्तम आईनाथ कल्याणकर यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्व SBIबँकेच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बुधवार दि 3 नोव्हेबर रोजी संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने तहसीलदार संतोष कामठेकर यांना केली आहे.

मौ. गोगदरी ता. कंधार जि.नांदेड येथील उत्तम आईनाथ कल्याणकर वय ५५ वर्षे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार या बँकेत नवीन कर्ज घेण्यासाठी गेल्या ३ महिण्यापासुन चकरा मारत होता.

पिक कर्ज देण्यासाठी अधिकारी व कर्मचा यांनी अपमानस्पद वागणूक दिली व सततच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद मयताची पत्नी सुशीलाबाई उत्तम कल्याणकर यांनी कंधार पोलिसात दिली आहे. पत्नीच्या फिर्यादीवरुन बँक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावे असे निवेदनाद्वारे मागणी तहसिलदार कंधार यांना केली आहे.

यावेळी बळीराम पा. पवार ,नितीन पा. कोकाटे, कृष्णा गोटमवाड ,विकास पा. लुंगारे आदी ची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *