कंधार : प्रतिनिधी
तहसिल कार्यालय कंधारच्या वतीने 2791 लाभार्थीना त्यांच्या बॅक/पोस्टखात्यावर अनुदान आज दुपारी जमा करण्यात आले आहे
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अनुसूचीत जाती व जमाती प्रवर्गाच्या 1691 लाभार्थीना 1840800 एवढे अर्थसहाय्य आणि इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व
इंदीरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व प्रवर्गाच्या 1100 लाभार्थीना 672800 रुपये एवढे अनुदान असे एकुण 2791 लाभार्थीना 2513600 एवढे अनुदान दि.3/11/2021 रोजी तहसील कार्यालयाकडून लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यासाठी बॅक/पोस्टाकडे वितरीत करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचीत जमातीच्या लाभार्थीना 4 महीन्याचे किमान 4000/- एवढे तर
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचीत जमातीच्या लाभार्थीना तीन महीन्याचे किमान 3000/- एवढे व अनुसुचीत जातीच्या संगांयो व श्राबायोच्या लाभार्थीना एक महीन्याचे राहीलेले अनुदान व इंगांयो योजनेच्या सर्व प्रवर्गाच्या लाभार्थीना तीन महीन्याचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
तरी लाभार्थीना आवाहन करण्यात येते की, अनुदान बॅक /पोस्ट ऑफीस मधुन अधिकृत व्यक्तीकडूनच उचलावे व त्याची पोच पावती घ्यावी. परीचयाच्या किंवा अपरीचयाच्या कोणत्याही व्यक्तीकडून अनुदान घेण्यासाठी अंगठा किंवा हाताच्या बोटाची ठसे देऊ नये आपली फसवणुक होऊ शकते.
दिवाळीच्या शुभेच्छा