कंधार:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील यांच्या मान्यतेने दिलीप दादा धोंडगे यांची
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना दि.६ नोव्हेबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा या निवडीतून केली आहे.
दिलीप दादा धोंडगे यांनी यापूर्वी निरीक्षक लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ म्हणून काम केले आहे ,तसेच त्यांनी नांदेड जिल्हा युवक काँग्रेस राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणून तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष नांदेड म्हणून त्यांनी आपली काम केले आहे.
राष्ट्रवादीचे संघटन कौशल्य मजबूत करून विचार प्रसार करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी परिश्रम घेतले आहे त्यामुळे त्यांची ही निवड आहे.
दिलीप दादा धोंडगे यांची
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवडी बद्दल सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.