भास्कर केशवराव कदम शेकापुरकर यांच्या शब्दातून ; कंधार येथे वंचित बहुजन आघाडीचे बोंबमारो अंदोलन संपन्न



कंधार ;


सोमवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी,वंचित बहुजन आघाडी चे नांदेड जिल्हाध्यक्ष,मा.शिवाभाऊ नरंगलेयांच्या नेतृत्वात कंधार नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विरोधातबोंबमारो आंदोलन करण्यात आले,या आंदोलनालामा.फारुख अहमद सर (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते)मा‌.गोविंद दळवी सर (OBC चे नेते,महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते)MIM चे कंधार तालुका अध्यक्ष,हैमुद्दीन भाई,संजय भाऊ निळेकर,व सम्यक विद्यार्थी आंदोल जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ वने व कंधार येथील सर्व छोटे मोठे व्यापारी व कंधार तालुक्यातील रहिवाशी असलेल्या तृतीयपंथी स्वातीताई केंद्रे यांच्यासह स्थानिक व ग्रामीण भागातील वंचित चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने उत्तम असं बोंबमारो आंदोलन यशस्वी झाले आहे,व पुर्वीप्रमाने रस्त्यावर बसणारे छोटे छोटे व्यावसायिक कुणालाही न घाबरता आपापली दुकाने चालु करुन नवजीवन जगण्यास प्रेरित झाली,अशा प्रकारे डफली बजाव आंदोलना नंतर, बोंब मारो आंदोलनही आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे यशस्वी केलात त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद…


भास्कर केशवराव कदम शेकापुरकर,          9096222370.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *