महात्मा फुले विघालय कंधार ची कु. सरस्वती मोहनराव वाघमारे मराठवाडा स्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय ; संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन. केंद्रे यांच्या वतीने कौतूक
कंधार; प्रतिनिधी
पक्षीसप्ताह निमित्तानं गतवर्षी लॉकडाऊन मध्ये ” मला आवडणारा पक्षी ” मराठवाडा स्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेत कंधार येथिल महात्मा फुले विद्यालयाची कु. सरस्वती मोहनराव वाघमारे हिने मराठवाड स्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असुन मान्यवरांचा हस्ते नांदेड येथे बक्षिस वितरण करण्यात आले. या यशाबद्दल संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी. एन. केंद्रे साहेब व सचिव चेतनभाऊ केंद्रे , संचालिका तथा कंधार नगरपालीकेच्या मा. नगराध्यक्षा सौ. अनुसया चेतन केंद्रे , महामा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.जी. केंद्रे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. वाघमारे यांच्या वतीने यशस्वी कु. सरस्वतीचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या.
गोदावरी इंटरनॅशनल स्कूलच्या निसर्ग रम्य परिसरात
इंद्रधनू सृष्टी संवर्धन संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नांदेड आयोजित पक्षीसप्ताहानिमित्त (दि.१२) रोजी सदरील कार्यक्रमाचे बक्षिस वितरण झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना परिसरातील पक्ष्यांची माहिती पक्षी अभ्यासक माणिक पुरी यांनी दिली .
पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे
उद् घाटन आंब्याच्या पानांचे तोरण बांधून केले
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दि.५ नोव्हेंबर ते डॉ. सलीम अली यांची जयंती दि.१२ नोव्हेंबर या दरम्यान पक्षीसप्ताह निमित्तानं ” मला आवडणारा पक्षी ” मराठवाडा स्तरीय निबंध स्पर्धा घेतली होती त्याचे बक्षिस वितरण करण्यात आले.
यास्पर्धेचे पारितोषिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.राजश्री हेमंत पाटील,अध्यक्ष, गोदावरी समूह तर प्रमुख अतिथी:
नीळकंठ पाचंगे,अव्वर कोषागार अधिकारी परभणी.राष्ट्रीय
पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ.अरविंद देशमुख, पक्षी अभ्यासक माणिक पुरी,.कीर्ती तगडपल्लेवार,हेमलता देसले पाटील
यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रोख रक्कम प्रमाणपत्र शाल पुष्पहाराने सन्मान केला संदीप उद्धवराव गायकवाड( प्रथम ), सरस्वती मोहनराव वाघमारे ( द्वितीय ), स्नेहल बळवंत जाधव ( तृतीय ), अश्विनी सुभाष चव्हाण ( तृतीय विभागून ) विभागातील एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला .
मान्यवरांचे स्वागत आंबवृक्ष व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक देऊन करण्यात आले .
प्रास्तविक सदा वडजे ,अध्यक्ष इंद्रधनू सृष्टी संवर्धन आजवरचे पर्यावरणाचे कार्य सांगितले आभार शिवाजी गावंडे, सचिव,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नांदेड व सुत्रसंचलन शिवाजी आंबुलगेकर, सचिव इंद्रधनू सृष्टी संवर्धन यावेळी
डाॕ .प्रा.श्रीराम गव्हाणे , संदिप बोरगेमवार,प्रा.हटकर,पंडित पाटील ,बसवंते
सौ.संगीता वडजे ,सौ .संगीता आंबुलगेकर आदींसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
द्वितीय बक्षिस पटकावणारी कंधार येथिल महात्मा फुले विद्यालयाची कु. सरस्वती मोहनराव वाघमारे हिच्या यशा बद्दल यशाबद्दल संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी. एन. केंद्रे साहेब व सचिव चेतनभाऊ केंद्रे , संचालिका तथा कंधार नगरपालीकेच्या मा. नगराध्यक्षा सौ. अनुसया चेतन केंद्रे , महामा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.जी. केंद्रे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. वाघमारे, जेष्ठ शिक्षक बाबुराव कंधारे , बी.एस गुट्टे , एच. के. केंद्रे , आर . बी .जाधव , जि.टी. गुट्टे , चंद्रकांत जाधव , शेख फिरदोस , किरण आगबोटे आदीने कौतुक केले.