माहुर नगर पंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत जाहिर.!

श्रीक्षेत्र माहूर :

माहूर नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल दि.१२ रोजी वाजले असून दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय माहूरच्या सभागृहात किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तथा माहूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी राकेश गिड्डे नगर पंचायतचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी व विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळी यांच्या उपस्थितीत माहूर नगर पंचायतीतील एकूण १७ वार्डासाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.


झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९ वार्ड सुटले असून वार्ड क्र. २,४,१० व १४ हे चार वार्ड खुला महिला प्रवर्ग साठी आरक्षित झाले आहेत तर वार्ड क्र. १, ७, ११, १३ व १५ हे वार्ड सर्वसाधारण खुला प्रवर्गसाठी सुटले आहेत. नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी ५ वार्ड आरक्षित झाले असून वार्ड क्रमांक.६, ९ व १२ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले असून वार्ड क्रमांक ८ व ३ नागरिकांचा प्रवर्ग खुला साठी सुटला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ वार्ड आरक्षित झाले असून वार्ड क्र.१६ अनुसूचित जाती खुला प्रवर्गासाठी तर वार्ड क्र. १७ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ वार्ड आरक्षित झाला असून वार्ड क्र.५ हा अनुसूचित जमाती महिला साठी आरक्षित झाला आहे. यावेळी कॉंग्रेसनेते माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, रष्ट्र्वादी कॉंग्रेस नेते माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी प्राचार्य भगवानराव जोगदंड पाटील, मेघराज जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख निर्धारी जाधव, न.प. गटनेते दीपक कांबळे, भाजपा नेते अड रमण जायभाये, सुमित राठोड, गोपू महामुने, प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्ता बोबडे, एमआयएम चे सिराज रजा, गोरसेनेचे प्रफुल जाधव आदीसह विविध राजकीय पक्षाचे विद्यमान न.प. पदाधिकारी, नगरसेवक नेते कार्यकर्ते व माहूर शहराच्या राजकीय क्षेत्रातील अनेक नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांची उपस्थिती होती. आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे मनसुबे उधळले असून हिरमोड झाल्याने ऐनवेळी योग्य असा सुरक्षित वार्ड शोधण्याची पाळी अनेक दिग्गजांना आली आहे.

तर काही जणांचे आजच्या आरक्षण सोडतीमुळे चांगभले झाले आहे. आरक्षण सोडत संपताच सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रणनीती ठरविण्यात व्यस्त झाले असून आरक्षण सोडती नुसार वार्ड निहाय प्रभावी उमेदवार उभे करून न.प. ची सत्ता खुर्ची ताब्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावण्यात व्यस्त झाल्याने दिवाळीच्या निमित्याने फराळ कार्यक्रमाची रेलचेल येत्या काही दिवसात माहूर शहरात दिसून येणार आहे. न.प. निवडणुकीच्या निमित्याने माहूर शहरातील राजकिय वातावरण तापण्यास खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *