फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील अगदी बसस्टॉप जवळंच शंकर निवास या इमारतीमध्ये श्री आणि सौ डॉ सादलापुरे यांच्या क्रष्णाई हाँस्पिटलचा शुभारंभ नुकताच सदगुरु श्री शिवलिंगया ,गुरू महाराज, मठ संस्थान हुलसूर,कर्नाटक यांच्या शुभहस्ते पार पडला.
दि १२ नोव्हें २१ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची लक्ष्मीपुजा आणि धन्वंतरी पुजा श्री लक्ष्मण महाराज स्वामी फुलवळकर यांनी केली. तर सादलापुरे परिवाराचे गुरु सदगुरू श्री शिवलिंगया गुरु महाराज, मठ संस्थान हुलसूर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांनी हुलसूरकर महाराज, लक्ष्मण महाराज स्वामी, रामलिंग महाराज मठपती आणि अंकुश महाराज गीरी यांचे शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी संजय महाराज हुलसूरकर,सादलापुरे परिवाराचे व्याही शि.भ.प.सोनबा गुरुजी शिराळे, फुलकळसकर, विठ्ठलराव बोरगावे, बी आर बनसोडे, माधवराव डांगे,
नारायणराव पटने गुरुजी, इरवंतराव शेंबाळे, खमरूद्दीन मोमीन, बालाजीराव मंगनाळे गुरुजी, ग्रा पंचायत सदस्य प्रविण पाटील मंगनाळे, निळकंठ मंगनाळे, आनंदराव पवार, राजु महाराज स्वामी, फुलवळकर, गंगाधर शेळगावे,बबनराव कुलकर्णी, संजय फुलवळे,रमेशराव माली पाटील, जयराम गुरुजी मंगनाळे, नारायण राव फुलवळे, चन्नबस आप्पा मंगनाळे ,
गौसमीयाँ पिंजारी,दिगांबरराव मंगनाळे, श्री बसवेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बापुराव मंगनाळे, परमेश्वर फुलवळे, शिवक्रपा मेडिकलचे प्रो प्रा गजानन पाकांडे,क्रष्णा हात्ते , शिवाजी शेळगावे ,प्रा भगवान आमलापुरे आणि सादलापुरे परिवारातील सर्वच लहान – थोरांची उपस्थिती होती.