पोलीस पाटील संघ जिल्हा कार्याध्यक्ष पदी इरबा देवकांबळे यांची बिनविरोध निवड..

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

     महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची एका विशेष बैठकीत नुकतीच नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून त्यात फुलवळ ता.कंधार येथील पोलीस पाटील इरबा देवकांबळे यांच्या आजपर्यंत च्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन  नांदेड जिल्हा दक्षिण विभागाच्या कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड केल्याचे जाहीर करताच सर्व स्तरातून इरबा देवकांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




  ता. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे म.रा.गा.का.पो.पा.संघाची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत म.रा.गा.का.सं.चे मार्गदर्शक व आदर्श श्री.शिवाजीराव जोगदंड पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष श्री शंकरराव कदम शिरशीकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री भास्करराव कंकाळ पाटील, जिल्हा सचिव श्री संभाजी पाटील मंडगीकर, तालुकाध्यक्ष श्री अमोल पाटील बस्वदे व इतर पोलिस पाटील उपस्थित होते.

  या बैठकीत नांदेड जिल्हा दक्षिण कार्याध्यक्ष म्हणून श्री इरबा भूजंगा देवकांबळे यांची व कंधार लोहा विभागीय अध्यक्ष म्हणून श्री माधव विठ्ठलराव कौशल्य यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *