डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ – माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरूडे

                    — म

कंधार दि.26 (ता.प्र.)  अनेक वर्षे पूर्ण अभ्यास करून भारत देशाला साजेल,शोभेल अशी सर्वसामान्य लोकांच्या हिताची सर्वांना समान हक्क मिळवून देणारी अशी ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन माजी आ.गुरूंनाथराव कुरुडे यांनी केले.       

  

          दि.26 नोव्हेंबर रोजी उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालय बहाद्दरपुरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी    डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून वंदन केले आणि   संविधानविषयी आपले विचार मांडताना ते म्हणाले की बाबासाहेबांचे या भारत देशाला सर्वसमावेशक घटना देऊन सर्वांना एकत्र बांधून ठेवले आहे. त्यामुळे देश त्यांचा सदैव ऋणी राहील असेहि ते म्हणाले. यावेळी जमलेल्या सर्वांनी संविधानाचे सामुहीक वाचन करण्यात केले.   

              यावेळी उपसरपंच हनमंत पा.पेठकर, ग्रा.पं. सदस्य भीमराव कदम, अवधूत पेठकर, शंकर खरात,माधवराव कदम, ग्रंथपाल संजय येमेकर, बाबुराव येमेकर,प्रदीप इंदूरकर, माणिकराव वंजे, हनमंत सकरलवाड,दत्तत्रय धोंडगे,रवींद्र कदम,विकि कुरुडे,सुलतान शेख, शफी शेख,मोहन शेकापुरे,शंकर आंबेकर आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होता.शेवटी आभार ग्रथपाल संजय येमेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *