गऊळ ;शंकर तेलंग
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान राष्ट्राला अर्पण केले त्याचे औचित्य साधून जिजामाता कन्या प्राथमिक शाळा कुरूळा तालुका कंधार जिल्हा नांदेड दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली यावेळी वाहण्यात आली. तसेच संविधान प्रस्ताविका चे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधानातील मुलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जनजागृती बनवणे राज्यघटनेतील व्यापक मूल्ये अंगी करावे त्यामध्ये स्वातंत्र्य, मूलभूत हक्क कर्तव्य समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये त्यांच्या अंगी जोपासण्यात यावे एकात्मता बळकट व्हावी या या दृष्टिकोनातून सविधान दि. 26 रोजी जिजामाता कन्या प्राथमिक शाळा कुरूळा येथे साजरा करण्यात आला आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर, जाधव सर, गंगापूर सर, भोसले मॅडम, कुरूळेकर मॅडम, वारे मॅडम, थोटे सर तेलंग सर आदी उपस्थिती होती.