कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील व कंधार शहरातील दिव्यांग बांधवाच्या विविध प्रश्नावर तहसीलदार संतोष कामठेकर यांच्याशी शेख दस्तगीर व शिष्टमंडळाने चर्चा तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले की आज कंधार मध्ये अशी काही दिव्यांग बांधव आहेत. ज्यांना चालता बोलता उठता-बसता येत नाहीत .अशा दिव्यांग बांधवांना तातडीने येणाऱ्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तीन डिसेंबरला अंतोदय योजनेचे कार्ड वाटप करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यांची मिटिंग तात्काळ लावण्याची ही विनंती करण्यात आली.
यावेळी मंडळाधिकारी शेख साहेब , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राज केकाटे , महिला तालुका अध्यक्ष संगीता धोंडाप्पा वाकडकर , नगरपालिकेचे अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते .
तहसीलदार संतोष कामठेकर यांनी तात्काळ चौकशी करून दिव्यांग बांधवांना येणाऱ्या जागतिक दिनानिमित्त अंत्योदय योजनेचे राशन कार्ड वाटप करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहीती प्रहार दिव्यांग संस्था कंधार चे अध्यक्ष शेख दस्तगीर यांनी दिली व दिव्यांगाच्या वतीने तहसीलदार साहेबांचे आभार मानन्यात आले.