क्रांतिनगरीत केळीच्या वावरात वन भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेवून पिकनिक चा आनंद व्दिगुणीत…

कंधार   ; प्रतिनिधी

कंधार तालूक्यातील डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे अन् अरभाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या चळवळीतून राज्यात नव्हे दैशात नावारूपास आलेल्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार .माझ्या आदर्श नगरीत कंधारच्या राष्ट्रकुट भुईकोट किल्ल्या शेजारी असलेल्या केळी व लिंबू उत्पादनात नावलौकिक मिळवून बक्षीसपात्र प्रगतशील शेतकरी व कृषिविभागात अरेखक   म्हणुन सेवानिवृत्त झालेले आमचे

मार्गदर्शक दादा बालाजी रावसाहेब पेठकर यांच्या केळीच्या थंडगार बागेत केळीच्या पानावर वनभोजनाचा मनमुराद आनंद घेता आला.भाकरीवर हिरव्या मिरचीचा ठेचा खातांना निसर्गाच्या सानिध्यात मुबलक प्राणवायुसंग अन्नाचा घास अमृताहूनी गोड लागला.

ही क्षण चित्रे जळकोट येथील छायाचित्रकार राठोड यांनी हा अविस्मरणीय क्षण माझ्या मोबाईलवर कैद करून आपली चुणूक दाखवली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *