अहमदपुर ; प्रा . भगवान आमलापुरे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतराव नाईक यांचा 5/12/1963 हा पहिला मुख्यमंत्री पदाचा सत्ता संपादन दिन भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था प्रा. फुलसिंग जाधव यांच्या संकल्पनेतून “संकल्प दिन “म्हणून साजरा करण्याचं ठरवून गेली सहा
वर्षा पासून गहुली येथे त्यांच्या स्मृती
स्थळावर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
त्याचाच एक भाग म्हणून आज संकल्प दिनाच आयोजन करण्यात आलं होत्त, कार्यकर्माचे अध्यक्ष माजी
सहकार उपायुक्त तथा बंजारा समाज
कर्मचारी सेवा संस्था चे माजी अध्यक्स मा. बळीभाऊ राठोड हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानायक वसंतराव नाईक, बाबासाहेब नाईक, सुधाकरराव नाईक
यांच्या विचारांना अभिवादन करण्यात
आले. या प्रसंगी लातूर, पुणे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांनीआपले प्रखर सामाजिक विचार मांडले .
त्यात एन डी राठोड
लातूर, टी व्ही राठोड कारंजा, डॉक्टर
दयाराम जाधव पुसद, प्रो. जय चंद चव्हाण भुली, आडे साहेब हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आज वसंतराव नाईक साहेबांच्या विज्ञानवादी विचाराची समाजाला गरज आहे. आजच्या युवकांला दिशा द्यायची गरज आहे ,
समाजाच्या सवलती बंद केल्या जात आहेत. समाजातील सर्व सामाजिक चळवळी एकत्र येउन समाजाची वर्जमूठ तयार करावी व समाज हीत
साधावे असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्माचे संचलन व आभार जयचंद चव्हाण यांनी मानले