कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील एकुण ३६ जिल्हयापैकी नांदेड जिल्हा हा लसीकरणाबाबतीत ३५ व्या स्थानावर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड सौ वर्षा ठाकुर घुगे यांनी कोव्हिड-१९ लसीकरणात नांदेड जिल्हा १०० टक्के उदिष्ट पुर्ण करण्यासाठी आज गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे सर्व विभागप्रमुख तसेच मुख्याध्यापक सर्व माध्यम व सर्व व्यवस्थानाच्या शाळा यांची आढावा बैठक घेऊन आठ दिवसात शंभर टक्के लसिकरणाचे उद्दीष्टे पुर्ण करण्याचा सुचना यावेळी दिल्या .
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी सर्व विभागप्रमुख यांच्याकडून लसिकरणाचे केंद्रनिहाय माहिती घेतली
दरम्यान कुरुळा ,दिग्रस , पेठवडज, बारूळ , हाळदा आदी गावात लसिकरण कमी झाले असल्याने अधिकारी व तलाठी आणि ग्रामसेवक यांनी योग्य नियोजन करून तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी दिल्या
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जाधव, प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक ,गट विकास अधिकारी सुदेश मांजरमकर , तहसीलदार संतोष कामठेकर, गटशिक्षणाधिकारी संजय एरमे, आरोग्य विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते .