विजेचा शॉक लागून जयवंत  फुलवळे ( फुलवळकर ) यांचा मृत्यु

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

     जयवंत नागेश फुलवळे  फुलवळकर वय 30 वर्ष , रा.फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांचे ता. ९ डिसेंबर रोजी दुपारी हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या नासापूर परिसरात थांबलेल्या गाडीवर विजवीतरण विभागाच्या मुख्य विजजोडणीच्या लोंबकळणाऱ्या तारा गाडी क्र. डी एन ०९ – यु ९७७३ च्या टॉप ला टच होऊन गाडीत उतरलेल्या प्रवाहामुळे विजेचा शॉक लागून चालक जयवंत फुलवळे यांचे अपघाती  निधन झाले.

    शवविच्छेदन करून प्रेत जन्मगावी आणून आज ता. १० डिसेंबर रोजी फुलवळ येथे  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

         त्यांच्या पश्चात आई-वडील , एक भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *