दत्त जयंती निमित्त मांजरम येथे कीर्तन सोहळ्या सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

नायगाव प्रतिनिधी
………………………

मांजरम ता नायगाव येथे दत्त जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यात किर्त कीर्तनकार यांचे कीर्तन व महापूजा, गुरुचरित्र पारायण सांगता व दहीहंडी सह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


दि.१७डिसेंबर शुक्रवार रात्री ९ वा श्री १०८महंत यदुबन गुरू गँभीर बन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या हस्ते महापूजा,दि.१८ डिसेंबर रोज शनिवारी सकाळी १० ते १२ दत्त जयंती सोहळ्या निमित्त ह.भ.प.भागवताचार्य बाबू महाराज काकांडीकर यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ ह.भ.प.शिवकथाकार कबीर महाराज आतार शिवपुरी पुणे यांचे कीर्तन होणार आहे. रात्री ११ ते पहाटे ४ एकनामी भजनी मंडळ मांजरम यांचे भजन व पहाटे ४ते ६ काकडा भजन होणार आहे.


दि.१९ डिसेंबर रोज रविवारी सकाळी ८ ते १० दताची पालखी मुख्य रस्त्यावरून निघणार आहे.तर १० ते १२ ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर यांचे काल्याचे कीर्तन दही हंडी व प्रसादाचे कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.


या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील दत्त भक्तांनी घ्यावा असे आवाहन दत्त जयंती मंडळ व ग्रामस्थ मांजरम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *